Ad will apear here
Next
शरद पवार आठ जुलैला चिपळुणात
तिवरे दुर्घटनास्थळी जाऊन तेथील ग्रामस्थांशी चर्चा करणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला आठ जुलै रोजी भेट देणार असून, या भेटीत ते तेथील ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत.

दोन जुलैला रात्री तिवरे येथील धरण फुटल्याने २३ जण वाहून गेली असून, त्यातील १९ जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्यापही काही जण बेपत्ता आहेत. धरण फुटीनंतर संबंधित अधिकारी व शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार आठ जुलै रोजी दुपारी १२ वाजता तिवरे धरणाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत.

पवार हे सात सात आणि आठ जुलै रोजी पुणे, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्‍यावर असून, पुणे येथील साखर कारखान्याच्या सेमीनारला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे गावाला भेट देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZVBCC
Similar Posts
‘तिवरे धरण बाधितांना सरकारकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार’ चिपळूण : आमदार भास्करराव जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार बाधित कुटुंबांना राज्य व केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज (आठ जुलै) तिवरे धरण दुर्घटनेच्या बाधित कुटुंबांना दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर
तावडे अतिथी भवनाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : आडीवरे (ता. राजापूर) येथे नव्याने बांधलेल्या तावडे अतिथी भवनाचे उद्घाटन माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते १० मे रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
‘...तर राहुल गांधींना विरोध करण्याचा अधिकार नाही’ मुंबई : ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये सांगितले की, त्यांच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळतील त्यावेळी पंतप्रधान पदाची जबाबदारी घेईन. देशातील जनता त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी देणार असेल आणि तसा कौल घेणारच आहेत, तर त्यांना विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी
‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language